राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या मंत्र्याला कोरोनाची लागण, कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले
Pune | Corona Virus: नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने तपासणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह.
पुणे: कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. जेएन.1 (JN.1) या नव्या सब व्हेरियंटने देशभरात पसरण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकरने सावध पवित्रा घेत काळजी घेण्याचं आव्हान केलेय.
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. ते सध्या पुण्यातील मॉडर्न कॉलनीमध्ये असलेल्या घरी विलीनीकरणात आहे. घरीच त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मागील चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे यांना खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. सध्या ते पुण्यातील आपल्या घरी विलगीकरणात आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर घरीच औषध उपचार सुरु आहेत.
नागपूर अधिवेशन संपल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने मी तपासणी केली असता पुन्हा एकदा कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मला सध्या फारसा त्रास नाही, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने मागील 4 दिवसांपासून क्वारंटाईन राहून योग्य उपचार घेत आहे. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. – मंत्री धनंजय मुंडे
Web Title: State Agriculture Minister Dhananjay Munde infected with corona virus
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App