Home संगमनेर संगमनेर शहर पोलिसांकडून नऊ गोवंश जनावरांची सुटका

संगमनेर शहर पोलिसांकडून नऊ गोवंश जनावरांची सुटका

Breaking News  | Sangamner Crime:  काटवनात कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधलेल्या नऊ गोवंश जनावरांची सुटका संगमनेर शहर पोलिसांनी नुकतीच केली असून ही जनावरे सायखिंडी येथील पांजरपोळमध्ये पाठविण्यात आली. (Raid)

Sangamner city police rescued nine cattle

संगमनेर: येथील मदिनानगरजवळ असलेल्या काटवनात कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधलेल्या नऊ गोवंश जनावरांची सुटका संगमनेर शहर पोलिसांनी नुकतीच केली असून ही जनावरे सायखिंडी येथील पांजरपोळमध्ये पाठविण्यात आली आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, शहरातील मदिनानगरजवळ असलेल्या काटवनात अदनान आसिफ कुरेशी (रा.खाटिक गल्ली, मोगलपुरा) याने मंगळवारी (दि.7) सायंकाळी कत्तल करण्याच्या उद्देशाने नव्वद हजार किमतीची नऊ गोवंश जनावरे निर्दयतेने व अन्न पाण्याविना बांधून ठेवली असल्याची माहिती गुप्त खबर्‍यामार्फत पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना समजली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, फराहनाज पटेल, पोकॉ. आत्माराम पवार, विशाल कर्पे आदी पोलिसांनी वरील ठिकाणी छापा टाकत नऊ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोकॉ. विशाल कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अदनान कुरेशी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बंडू टोपे करत आहेत.

Web Title: Sangamner city police rescued nine cattle

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here