खळबळजनक! विद्यार्थिनीने बुटांच्या लेसचा दोर बनवून शाळेतच घेतला गळफास
Breaking News | Suicide Case: एका विद्यार्थिनीने शाळेतच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार.
मुंबई : देशभरात क्राईमच्या घटनांमध्ये वाढ होत असताना मुंबईतून धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका विद्यार्थिनीने शाळेतच आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गोरेगाव येथील नामांकित शाळेत ही घटना घडली असून याप्रकरणी आरे पोलीस ठाण्यात एडीआर दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोरेगावमधील ओबेराय इंटरनॅशनल शाळेत काल सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. एका अकरावीच्या विद्यार्थिनीने शाळेच्या बाथरूम मध्ये जाऊन बुटाच्या लेसच्या साह्याने गळ्याला दोर लावून गळफास घेतला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच आरे पोलिसांनी शाळेत दाखल होत मुलीची डेड बॉडी पोस्टमार्टम करण्यासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. सध्या आरे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत मुलींनी एवढा मोठा टोकाचा पाऊल का उचलला यामागे काय कारण आहे. याबाबत अधिक तपास आरे पोलीस करत आहेत.
Web Title: student hanged herself in school by making a shoelace rope
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News