Home पुणे दाजीने विवाहित मेहुणीवर केला बलात्कार; Breaking News

दाजीने विवाहित मेहुणीवर केला बलात्कार; Breaking News

Breaking News | Pune Crime: उत्सवासाठी घरातील सर्वजण बाहेर गेल्याची संधी साधून दाजीने विवाहित मेहुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना.

Aunty raped married sister-in-law

पुणे: उत्सवासाठी घरातील सर्वजण बाहेर गेल्याची संधी साधून दाजीने विवाहित मेहुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वारजे माळवाडी परिसरात घडली आहे. डोके दुखत असलेल्या मेहुणीला गुंगीच्या गोळ्या खाण्यास देऊन तिच्यावर जबदरदस्तीने बलात्कार केला आहे. याप्रकरणी १८ वर्षांच्या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून 36 वर्षीय दाजीवर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेच्या घरातील लोक दि. 3 ते 12 ऑक्टोबर 2024 कालावधीत नवरात्रीनिमित्त यात्रेसाठी गेले होते. त्यावेळी तिचा दाजी घरी होता. तरुणीचे डोके दुखत असल्याचे दाजीला सांगितले होते. त्यावेळी दाजीने घरात कोणीही नसल्याची संधी साधून मेहुणीला दोन गोळ्या खायला दिल्यामुळे तिला गुंगी आली. त्याचदिवशी संधीचा फायदा घेऊन आरोपीने मेहुणीवर जबरदस्तीने बलात्कार केला.

तू आपल्यामध्ये झालेल्या शारीरिक संबंधाबद्दल कोणाला काही सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली. शारीरिक संबंधाचे चित्रीकरण तरुणीच्या सासरी व पतीला दाखवून तिच्या पतीला शिवीगाळ करत भांडणे केली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे.

Breaking News: Aunty raped married sister-in-law

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here