Home नाशिक साखरपुड्यातच होणाऱ्या बायकोची बॉयफ्रेंडला मिठी, नवरदेव आयटी अधिकारी याची आत्महत्या Breaking News

साखरपुड्यातच होणाऱ्या बायकोची बॉयफ्रेंडला मिठी, नवरदेव आयटी अधिकारी याची आत्महत्या Breaking News

Breaking News | Nashik Crime: सततच्या त्रासाला कंटाळून आयकर अधिकारी असलेल्या तरुणाची  गळफास घेऊन आत्महत्या.

IT officer's suicide in Navradeo

नाशिक : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आलीये. साखरपुड्यातच नवरीने प्रियकराला मिठी मारल्याने नवरीचं प्रेम प्रकरण तिच्या होणाऱ्या नवऱ्याला समजलं. नवरीचा होणारा नवरा IT अधिकारी होता. होणाऱ्या बायकोचं अफेअर समजताच त्याने लग्नाला नकार दिला. मात्र, होणाऱ्या नवरदेवाने लग्नाला नकार दिल्यानंतर नवरीने त्याला ‘लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणात अडकवेन’, अशी धमकी दिली. नवरीकडून येणाऱ्या धमकीमुळे अधिकारी नवरदेव नैराशात केला. त्याने आयुष्य संपवलंय. या प्रकरणी नाशिकमध्ये धमकी देणाऱ्या नवरीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. हरेकृष्ण पांडे असं आत्महत्या केलेल्या नवरदेवाचं नाव आहे.

नाशिकमध्ये कार्यरत असलेल्या आयकर अधिकारी हरेकृष्ण पांडे यांचा उत्तर प्रदेशातील एका मुलीसोबत साखरपुडा झाला होता. मात्र, हरे कृष्णा पांडे यांच्या साखरपुड्यातच त्यांच्या होणाऱ्या पत्नीने एका तरुणास मिठी मारली नेमका हा तरुण कोण? असा प्रश्न पांडे यांना पडला. मात्र, खरं कारण पांडे यांच्यासमोर आलं आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. साखरपुड्यामध्ये मिठी मारणारा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून पांडे यांच्या होणाऱ्या पत्नीचा प्रियकर असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला.

साखरपुड्याच्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे पांडे हे तणावात होते. होणाऱ्या पत्नीला मिठी मारणारा तिचा प्रियकर असल्याची माहिती हरेकृष्ण पांडे यांना समजताच त्यांनी लग्न करण्यास नकार दिला. मात्र, होणाऱ्या पत्नीने ‘लग्न कर नाहीतर हुंडा मागितल्याच्या गुन्ह्यात तुला अडकवेल’, अशी धमकी दिली. सततच्या त्रासाला कंटाळून आयकर अधिकारी असलेल्या हरेकृष्ण पांडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. हरे कृष्ण पांडे यांच्या आत्महत्यानंतर नाशिकच्या अंबड पोलिसांनी सखोल तपास करत होणारी पत्नी मोहिनी पांडे, तिचा प्रियकर सुरेश पांडे आणि त्याचा साथीदार मुनेंद्र पांडे या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. मात्र, सध्या फरार असलेल्या या तिघांचा नाशिक पोलिसांकडून शोधू सुरू आहे.

Breaking News: IT officer’s suicide in Navradeo

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here