मोठी बातमी! अमेरिकेकडून भारतावर अतिरिक्त २५ % कर लादण्याची घोषणा
Breaking News | Donald Trump On Tarrif: अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के कर लावण्याची घोषणा.
दिल्ली । वृत्तसंस्था: काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर २५% कर लावण्याची घोषणा केली होती. भारताने रशियन तेलाची सतत खरेदी केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. कालच ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर अधिक टॅॅरिफचीची सुतोवाच केल्या नंतर आज अमेरिकेकडून भारतीय वस्तूंवर अतिरिक्त २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे.
या नंतर आता भारतीय वस्तूंवर अमेरिकेत एकूण ५० % टॅॅरिफ लागणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून अनेक मोठे निर्णय घेत आहेत. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांची जगभरात मोठी चर्चा सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांचा जगातील अनेक देशांना मोठा फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती. तसेच भारताकडून दंड वसूल करण्याबाबत धमकीवजा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता.
दरम्यान, त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला आणखी एक मोठा दणका दिला आहे. भारतावर २५ टक्के अतिरिक्त आयातशुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी आज (६ ऑगस्ट) केली आहे. त्यामुळे आता अमेरिकेकडून भारतावर लावण्यात येणारे एकूण आयातशुल्क ५० टक्क्यांवर पोहोचलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे. बातमी अपडेट होत आहे.
Breaking News: Donald Trump On Tarrif