Breaking News | Ahmednagar: हवामान विभागाकडून नगर जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस म्हणजे 14 तारखेपर्यंत पावसाचा यलो अलर्ट.
अहिल्यानगर: केरळ किनारपट्टीवरील कमी दाब क्षेत्र सध्या लक्षद्विपवरून अरबी समुद्राच्या मध्यावर पोहोचत आहे. परिणामी 13 ऑक्टोबरदरम्यानच्या मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्ह्यात भाग बदलत दुपारनंतर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. दुसरीकडे हवामान विभागाकडून नगर जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस म्हणजे 14 तारखेपर्यंत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील पाऊस आणि हवामानाबाबत माहिती देताना खुळे यांनी स्पष्ट केले की राज्यातील पाऊस अजून नंदुरबारपर्यंतच जागेवर खिळलेला आहे.
सध्या पडणार्या पावसामुळे शेती पिकांना व फळबागांना अपाय होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यातील दुसर्या आवर्तनातील पावसापासून म्हणजे मंगळवार 22 ऑक्टोबरनंतर होणार्या पावसाचा कोकणातील शेतपिके व फळबागांना फायदा होणार आहे. सध्या महाराष्ट्राच्या भूभागावर ताशी 28 तर मुंबईसह कोकण किनारपट्टीवर ताशी 37 किमी वेगाने पूर्वेकडून अरबी समुद्रातील हवेच्या तीव्र कमी दाब क्षेत्रामुळे वारे वाहत आहे. दोन्हीही समुद्रातून होणार्या बाष्प पुरवठ्यामुळे रविवार 13 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राबरोबर मुंबईसह कोकणातही हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीनसह अन्य पिकांची सोंगणी आणि मळणी सुरू आहे. यामुळे पडणार्या पावसामुळे शेतकर्यांची एकच धावपळ उडाली आहे. पुढील तीन ते चार दिवस पावसाचे असल्याने शेतकर्यांना तयार होणार्या पिकांची काळजी घ्यावी लागणार आहे.
राज्यातून परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात झाली नसून, १५ ऑक्टोबरपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नागपूर येथील प्रादेशिक विभागाने दिली आहे. यामुळे आता राज्यात जो पाऊस होत आहे, त्याला परतीचा पाऊस म्हणता येणार नाही, असे या विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, येत्या दिवसात विदर्भासह राज्यात परतीचा पाऊस खान्देशातील नंदुरबार जिल्ह्याला स्पर्शन गेला आहेसध्या परतीचा पाऊस हा देशातील पंजाब, हरयाणा, हिमालय, कच्छ, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा काही भाग, गुजरातमध्ये परतला असून, महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्याला स्पर्शन गेला आहे. राज्यातील परतीच्या पावसाचे चित्र १५ ऑक्टोबरपर्यंत स्पष्ट होण्याचे संकेत आहेत. येत्या तीन दिवसांत दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांतून म्हणजेच सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Web Title: Yellow alert for Ahilyanagar till this date
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study