Home पुणे अनैतिक संबंधातून नवऱ्याला संपवलं, रात्री दीड वाजता मृतदेह स्कूटरवर ठेवला अन…

अनैतिक संबंधातून नवऱ्याला संपवलं, रात्री दीड वाजता मृतदेह स्कूटरवर ठेवला अन…

Breaking News | Pune crime: अनैतिक संबंधातून पतीची पत्नीकडून आणि प्रियकराकडून हत्या केल्याची धक्कादायक घटना.

She killed her husband due to an immoral relationship

पुणे: पुण्यात अनैतिक संबंधातून पतीची पत्नीकडून आणि प्रियकराकडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. हत्यानंतर पतीचा मृतदेह पोत्यात घालून 55 किलोमीटर दूर नेला अन् विल्लेवाट लावल्याचं देखील समोर आलंय.

याबाबत अधिक माहिती अशी की, हडपसर परिसरात राहणाऱ्या एका महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. तिचा प्रियकर दररोज तिला लपूनछपून भेटायला येत असायचा. पण नवऱ्याचा याची काहीही खरब लागायची नाही. एक दिवस रात्री नवरा बायको झोपलेले असताना प्रियकर अचानक भेटण्यासाठी घरी आला. बायकोने प्रियकराला निघून जाण्यास सांगितलं.

पण तेवढ्याच नवऱ्याला कून कून लागली. नवऱ्याने उठून पाहिल्यावर त्याला पत्नी आणि तिचा प्रियकर दिसला. यानंतर दोघांमध्ये भांडणं झाली. याच भांडणात पत्नीने आणि प्रियकराने नवऱ्याची हत्या केली. भांडणात नवऱ्याचा मृत्यू झाल्याचं पत्नीच्या लक्षात आलं अन् डोक्याला हात लावला.

बायको आणि तिच्या प्रियकराने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. रात्री दीड वाजता स्कुटरवरून मृतदेह हडपसरपासून सारोळ्याला नेला. 55 किलोमीटर दूर असलेल्या नदीत मृतदेहाची विल्हेवाट लावली. पण पोलिसांना या हत्येचा सुगावा लागला अन् आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: She killed her husband due to an immoral relationship

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here