अहिल्यानगर: पोहायला गेलेल्या मुलांचा तलावात बुडून मृत्यू
Breaking News | Ahmednagar: शाळेत न जाता तलावात पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू.
अहिल्यानगर : शाळेत न जाता तलावात पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. १०) दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास ब्राह्मणतळे (आलमगीर, ता. अहिल्यानगर) परिसरातील तलावात घडली.
अमजत जावेद शेख (वय १३, रा. अलमगीर, ता. अहिल्यानगर), मोहम्मद साद अन्सारी (१६, रा. सदर बाजार, भिंगार, ता. अहिल्यानगर), अशी मृतांची नावे आहेत. मोहम्मद अन्सारी अमजत शेख ही दोन्ही मुले गुरुवारी दुपारी ब्राह्मणतळे येथील तलावात पोहण्यासाठी गेली होती. त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. मोहम्मद हा भिंगार येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत तर अमजत हा भिंगार हायस्कूलमध्ये शिकत होता. या दुर्घटनेबाबत भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
Web Title: Children who went swimming drowned in the lake
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study