Breaking News | Sangamner Crime: एका महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना. (young woman for molestation )
संगमनेर: एका महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना काल मंगळवारी शहरात घडली. याप्रकरणी येथील पोलिसांनी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या तालुक्यातील २० वर्षांची तरुणी शिक्षणासाठी तालुक्यातील आपल्या नातेवाईकांच्या घरी दोन वर्षापासून राहत आहे. सध्या ती येथील महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. काल मंगळवारी ते दोघे कॅफेमध्ये बसलेले असताना आरोपीने तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
नवीन अधिक जलद बातमी मिळविण्यासाठी आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज
त्यानंतर पीडित तरुणीने नातेवाईकांना माहिती देवून शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी हुजेब आदाम शेख याच्याविरुद्ध विनयभंगासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
Web Title: young woman for molestation in Sangamner