शिर्डी पुन्हा हादरली! मुलानेच केली वडिलांची निर्घृण हत्या
Breaking News | Shirdi Crime: मुलानेच वडिलांची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली.
शिर्डी: शिर्डी शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, मुलानेच वडिलांची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घरगुती वादातून मुलाने वडिलांना लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. या मारहाणीत 54 वर्षीय दत्तात्रेय शंकर गोंदकर यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालातून हा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट होताच, शिर्डी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत आरोपीविरुद्ध हत्या गुन्हा दाखल केला. या घटनेत आरोपी मुलगा शुभम गोंदकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ही घटना 6 मार्च रोजी घडली होती, मात्र तब्बल पाच दिवसांनंतर हा प्रकार उघड झाला. सुरुवातीला हा अकस्मात मृत्यू म्हणून सादर करण्याचा प्रयत्न झाला, पण शवविच्छेदन अहवालाने हत्या झाल्याचे स्पष्ट केले. या घटनेने शिर्डी शहर पुन्हा हादरले असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
Web Title: Son brutally murdered his father