Breaking News | Raigad Crime: एका महिलेवर कारमध्ये अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.
रायगड: सुधागड तालुक्यातील एका महिलेवर कारमध्ये अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पाली पोलीस ठाणे हद्दीत 5 डिसेंबर 2020 रोजी 29 ऑगस्ट 2024 दरम्यान ही घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुधागडातील आरोपी याने फिर्यादी महिलेशी ओळख वाढवून आरोपीने फिर्यादी याचेसोबत पनवेल येथून गोरेगाव येथे जात असताना पालीपासून 3 ते 4 किमी अंतरावर बाजुला कार थांबून दारू पिवून फिर्यादीवर अत्याचार केले. ही गोष्ट पतीला सांगेन अणि तुला मारेन अशी धमकी देवून फिर्यादी यांच्या सोबत वारंवार त्यांचे इच्छेविरुद्ध अत्याचार केले. याबाबत पाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी हे करीत आहेत.
Web Title: Woman assaulted in car
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study