Home अहिल्यानगर संभाजीराजे नवीन पक्ष काढणार का भाजपच्या या नेत्याने मांडले मत

संभाजीराजे नवीन पक्ष काढणार का भाजपच्या या नेत्याने मांडले मत

Will Sambhaji Raje form a new party Radhakrishna Vikhe Patil opinion

Radhakrishna Vikhe Patil: संभाजीराजेंनी नवीन पक्ष काढण्याच्या संदर्भात काल पत्रकारपरिषदेत सुतोवाच केले. मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने भूमिका मांडलेली नाही. आरक्षणाचा अंतिम निर्णय आणि आरक्षण पदरात पाडून घेण्यासाठी सर्व संघटनानी एकत्रित येवून सरकारवर दबाव आणावा लागेल असे मत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

विखे म्हणाले संभाजीराजेंनी मांडलेली भूमिका ही मराठा समाजाच्या हिताची आहे. पण केवळ सरकारला अल्टीमेटम न देता सर्व संघटनांना एकत्रित घेऊन भूमिका मांडण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडी हे सरकार आरक्षण देण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहे. आपले अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवत आहे. सरकारमधील नेत्यांची वेगवेगळी मते पाहता सरकारचा हेतू प्रामाणिक नसल्याची टीका त्यांनी केली.

नवीन पक्ष काढण्याबाबतचा निर्णय हा सर्वस्वी संभाजीराजेंचा व्यक्तिगत असल्याचा त्यांनी सांगितला. मात्र मराठा समाजाने कोणत्याही पक्षाच्या बाजूने आपली भूमिका मांडली नाही. सर्वांना एकत्रित घेऊनच पुढचे पाउल टाकावे लागेल. सर्व संघटनानी एकत्रित दबाव आणण्याशिवाय पर्याय नाही असे ते म्हणाले.   

Web Title: Will Sambhaji Raje form a new party Radhakrishna Vikhe Patil opinion

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here