संगमनेर ब्रेकिंग: महिलेच्या अंगावर वीज कोसळून ठार, चार शेळ्यांचा मृत्यू
संगमनेर | Sangamner: शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अंगावर वीज कोसळून महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे घडली. यामध्ये चार शेळ्यांचादेखील अंत झाला आहे.
शेतामध्ये शेळ्या चारण्यासाठी गेल्या असताना अचानक विजेचा कडकडाट झाल्याने ही घटना घडली आहे. अनिता उर्फ मुक्ताबाई संजय वणवे वय ४० असे मयत झालेल्या महिलेच्या नाव आहे.
संगमनेर तालुक्यातील साकुर परिसरात आज शनिवारी सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण व विजेचा कडकडाट व पाउसाला सुरु झाला. साकुर येथून काही अंतरावर हिवरगाव पठार येथे राहत असलेल्या अनिता वणवे घरापासून काही अंतरावर शेळ्या चारण्यासाठी गेल्या होत्या. त्यादरम्यान अचानक विजेचा कडकडाट झाला आणि अंगावर वीज पडून या महिलेचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये चार शेळ्या देखील ठार झाल्या, यानंतर काही वेळाने पाउस सुरु झाला.
या घटनेची माहिती समजताच प्रांतधिकारी शशिकांत मान्गृलेम गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. घारगाव पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश टकले हे करीत आहे.
Web Title: Sangamner Woman electrocuted four goats killed