प्रेमप्रकरण जीवावर उठलं! पुण्यातील हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटित हत्या
Breaking News | Pune Crime: पुण्यातील एका हिरे व्यापाऱ्याचा गुवाहाटीतील हॉटेलमध्ये मृतदेह (Murder) आढळल्याने मोठी खळबळ.
पुणे: पुण्यातील एका हिरे व्यापाऱ्याचा गुवाहाटीतील हॉटेलमध्ये मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. प्रेमप्रकरणातून या व्यापाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. याप्रकरणी कोलकत्ता येथे राहणाऱ्या एका जोडप्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी या याबाबत माहिती दिली आहे. गुवाहाटीचे पोलिस आयुक्त दिगंता बराह यांनी याविषयी माहिती दिली आहे.
संदीप कांबळे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पुण्यातील शास्त्रीनगर येथील ते रहिवाशी आहेत. विकास कुमार शॉ आणि अंजली शॉ अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींनी आपणच खून केल्याची कबुली दिली आहे. गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये संदीपचा मृतदेह आढळला होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, व्यवसायाच्या निमित्ताने संदीप कांबळे हे देशभर फिरत असतात. मागील वर्षी 2023 मध्ये ते कोलकाता येथे गेले असताना त्यांची भेट अंजली शॉ हिच्याबरोबर झाली होती. दोघांनीही एकमेकांचा नंबर मिळवला. त्यानंतर दोघांमधील बोलणे भेटणे वाढले. पुणे, कोलकत्ता येथे त्यांच्यात भेटीही झाल्या. संदीप कांबळे हा विवाहित होता. मात्र तरीही त्याने अंजलीपुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र तिने त्यास नकार दिला.
अंजलीने लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर संदीप चिडला. त्यानंतर अंजलीने त्याच्यासोबत भेटणे व बोलणेही टाळले. त्यानंतर संदीपचा राग अनावर झाला. त्याने अंजलीसोबतचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. संदीपने अंजलीचा प्रियकर आणि कुटुंबीयांनाही फोन करुन धमकी दिली होती. तसंच, अंजलीचे फोटो तिच्या प्रियकराला पाठवले.
संदीपने अंजलीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकला होता. तो सतत तिला प्रियकरापासून वेगळं होण्यासही सांगत होता. संदीपच्या रोजच्या त्रासला वैतागून अंजली आणि तिच्या प्रियकराने त्याला संपवण्याचा कट रचला. ब्लॅकमेलिंगला कंटाळून आरोपी महिलेने तिच्या प्रियकरासोबत संदीपला एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवले होते. त्याला भेटून कसही करुन त्याच्याकडून मोबाइल हिसकावून घेण्याचा प्लान त्यांनी रचला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी आरोपी महिला संदीप कांबळेला गुवाहाटीच्या विमानतळावर भेटली त्यानंतर ती त्याच्यासह रेडिसन ब्लू हॉटेलला रवाना झाली. जिथे त्यांनी चेक-इन केले. महिलेचा 23 वर्षीय प्रियकरदेखील या हॉटेलमध्येच थांबला होता. साधारण दोन वाजण्याच्या सुमारास महिलेचा प्रियकर त्यांच्या खोलीत दाखल झाला आणि दोघांमध्ये मोठा वाद झाला. ज्यात व्यापारी गंभीररित्या जखमी झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. आरोपी विमानतळावर पोहोचल्यावरच त्यांना अटक (Arrest) करण्यात आले.
Web Title: love affair came to life! Guwahati murder of a diamond merchant in Pune
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study