Home अकोले पराभव पचवता आला नाही, विरोधकांच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका- आ. खताळ  

पराभव पचवता आला नाही, विरोधकांच्या अपप्रचारावर विश्वास ठेवू नका- आ. खताळ  

Breaking News | Sangamner: जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय आश्वी येथील अप्पर तहसील कार्यालयबावत अंतिम निर्णय घेतला जाणार नाही, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Defeat could not be digested, do not believe the propaganda Amol Khatal

संगमनेर तालुक्यातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय आश्वी येथील अप्पर तहसील कार्यालयबावत अंतिम निर्णय घेतला जाणार नाही, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

आश्वी येथील प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयाच्या अंतर्गत संगमनेर शहरालगतच्या गावांचा समावेश करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या कार्यालयावरून माजी मंत्री थोरात यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांनी काल गुरुवारी येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली.

याबाबत ते पुढे म्हणाले, अप्पर तहसील कार्यालय निर्मिती करणे हा प्रशासकीय कामकाजाचा भाग आहे. मागील सरकारच्या काळात प्रशासकीय कामकाजाचा तालुक्यांचे प्रशासकीय कामकाजासाठी विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून संगमनेरच्या तहसीलदारांनीही जिल्हाधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव सादर केल्याचे बोलले जात आहे. याबाबतचा कुठलाही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

तालुक्यातील जनतेने मला निवडून दिले आहे. त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही. जनतेला विश्वासा त घेतल्याशिवाय कुठलाही अंतिम निर्णय घेतला जाणार नाही. संगमनेरच्या तहसील कार्यालयाकडून हा प्रस्ताव पाठवताना काळजी घेतली गेली नाही. हा प्रस्ताव जाणीवपूर्वक बाहेर पाठवला असून याची माहिती आपण घेतली आहे. संबंधित व्यक्तीविरुद्ध योग्य ती कारवाई निश्चित केली

आपण पुढील आठवड्यात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेवून या प्रस्तावाला स्थगिती घेणार आहोत, त्यानंतर महसूल विभाजनात समाविष्ट होणाऱ्या गावांना विश्वासात घेवूनच त्यांचा आश्वी तहसीलच्या कार्यक्षेत्रात समावेश केला जाईल, असे ते म्हणाले.

तालुक्यातील जनतेने चाळीस वर्षाची दहशत मोड्न आपल्याला विजयी केले आहे. त्यांच्या विश्वासाला आपल्याकडून तडा जाणार नाही. तालुक्यात राबवला जाणारा कोणताही प्रभावी शासन निर्णय जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय राबवणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली.

या संदर्भात या विचारणा होऊ लागल्याने खुलासा करणे गरजेचे होते. या तालुक्याचा मी लोकप्रतिनिधी आहे. या प्रश्नासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे. जनतेची मते विचारात घेऊनच निर्णय घेतले जातात. अप्पर तहसील बाबत देखील चर्चा केली जाणार आहे. अप्पर तहसील कार्यालया बाबत माहिती न घेता अर्धवट माहितीवर अपप्रचार केला आहे. अनेकांना पराभव पचवता आला नाही, अजूनही ते सावरू शकले नाही.

यामुळे तालुक्यात संभ्रम निर्माण झाला आहे. चाळीस वर्षात विरोधकांनी फक्त राजकारण केले आहे. जर अप्पर तहसील कार्यालय सोयीचे नसेल तर निर्णय होणार नाही. नागरिकांनी विरोधकांच्या अपप्रचार विश्वास ठेवू नका असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Defeat could not be digested, do not believe the propaganda Amol Khatal

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here