Home राहुरी अहिल्यानगर: मुळा नदीपात्रात आढळला विवाहित तरुणाचा मृतदेह

अहिल्यानगर: मुळा नदीपात्रात आढळला विवाहित तरुणाचा मृतदेह

Breaking News | Ahilyanagar Crime: वळण येथील मुळा नदी पात्रात काल सोमवारी सकाळी एका ४० वर्षीय विवाहित तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

dead body of a married youth was found in the Mula riverbed

राहुरी: राहुरी तालुक्यातील वळण येथील मुळा नदी पात्रात काल सोमवारी सकाळी एका ४० वर्षीय विवाहित तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. आदिनाथ बाळासाहेब आढाव (रा. वळण), असे वा मृत व्यक्तीचे नाव आहे.

काल सोमवारी सकाळी नऊ वाजता ही घटना उघडकीस आली आहे. सदर इसमाने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. याबावत मिळालेल्या माहितीनुसार, येथील आदिनाथ उर्फ डिंगु बाळासाहेब आढाव हा शनिवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरातून गायब झाला होता. त्यानंतर त्याची मोटारसायकल वळण अमरधाम, मुळा नदीच्या तीरावर आढळून आली होती.

दरम्यान त्याचा सर्वत्र शोध घेतला असता, तो मिळून न आल्याने राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. काल सोमवारी सकाळी वळण येथील मुळा नदी पात्रात त्याचा मृतदेह तरंगताना काही ग्रामस्थांना आढळून आला. सदर मृतदेह स्थानिकांच्या मदतीने बाहेर

काढण्यात आला. घटनेची माहिती राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळताच घटनास्थळी पोलीस हवालदार अशोक शिंदे, दिपक फुंदे, दिगंबर सोनटक्के आदी पोलीस पथकाने धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मृत आदिनाथ आढाव याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, भाऊ, असा परिवार आहे. त्याच्यावर दुपारी तीन वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबतचा पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे.

Web Title: dead body of a married youth was found in the Mula riverbed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here