हॉटेलमध्ये कपलने घालवली रात्र, अचानक सुरू झाला आक्रोश अन् किंकाळ्या, पाहून पोलीसही हादरले
Pune Crime: हॉटेलमध्ये दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं आढळलं.
पुणे : पुण्याच्या बाणेर भागातल्या हॉटेलमध्ये दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं आढळलं आहे. या दोघांच्याही शरिरावर चाकूचे घाव घालण्यात आले होते, यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, दोघांचीही प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दोघंही सध्या बोलण्याच्या स्थितीमध्ये नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, टेम्पो चालक असलेला 39 वर्षीय व्यक्ती रविवारी त्याच्या पत्नीसोबत बाणेरच्या हॉटेलमध्ये राहायला आला होता. रविवारची रात्र हॉटेलमध्ये घालवल्यानंतर सोमवारी दोघांमध्येही जोरदार भांडण झालं, यानंतर पतीने पत्नीवर चाकूने वार केले, यानंतर पीडित महिला स्वत:चा जीव वाचवण्यासाठी जोरजोरात ओरडायला लागली. हा आवाज ऐकून हॉटेलचा स्टाफ खोलीच्या दिशेने धावत आला.
हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी रूमची बेल वाजवली, पण कुणीही दरवाजा उघडला नाही. अखेर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडला तेव्हा पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पत्नीवर हल्ला केल्यानंतर पतीने स्वत:वरही चाकू चालवला, यामध्ये पती आणि पत्नी गंभीर जखमी झाले. या सगळ्या प्रकारानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं.
पोलीस हॉटेलमध्ये दाखल झाल्यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे पती-पत्नी बोलण्याच्या स्थितीमध्ये नसल्यामुळे पोलिसांनी दोघांच्याही कुटुंबाचा शोध घेतला. तेव्हा आरोपी पती मुंबईच्या चेंबूर भागात राहतो, अशी माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीच्या आईची चौकशी केली, यानंतर तो टॅक्सी आणि टेम्पो ड्रायव्हर असल्याचं पोलिसांना कळालं. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: couple was found lying in a pool of blood in the hotel
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News