Home संगमनेर संगमनेरातील जमाव मारहाणप्रकरणी आणखी एकाला अटक

संगमनेरातील जमाव मारहाणप्रकरणी आणखी एकाला अटक

Breaking News | Sangamner: कोल्हेवाडी रोडवरील मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश.

Another person arrested in Sangamner mob beating case

संगमनेर : शहरातील कोल्हेवाडी रोडवरील मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या एका अल्पवयीन मुलासह तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, यातील दोघांना न्यायालयाने १८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड वरील नाटकी नाल्याजवळ तिघा जणांना जमावाने जबर मारहाण करून जखमी केले होते. तीन जणांचा इतर पाच जणांवर आर्म अॅक्ट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यातील सर्व गुन्हेगार फरार झाले होते. त्यामुळे संतप्त हिंदुत्ववादी संघटनांच्या तरुणांनी बैठक घेऊन दोन दिवसांत राहुल गुंजाळ, अमोल गुंजाळ व संदीप गुंजाळ यांना मारहाण करणाऱ्यांना अटक केली नाही आणि या भागातील अतिक्रमण काढले नाही, तर जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.

संगमनेरच्याप्रांताधिकारी कार्यालयात महसूल नगरपालिका, सार्वजनिक बांध काम विभाग व पोलिस प्रशासन यांच्यात तातडीची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दिल्ली नाका व कोल्हेवाडी रोड परिसरातील अतिक्रमणधारकांना नोटिस देण्यात आल्या होत्या.

तसेच मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी पोलिस प्रशासनाने सापळा लावला होता. गुरुवारी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असणारा सोळा वर्षीय अल्पवयीन मुलासह अरबाज गुलामनबी कुरेशी (वय २४, रा. अलकानगर, जुना जोर्वे रोड) या दोघांच्या मुस्क्या आवळण्यात आल्या.

अरबाज कुरेशी यास १८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, तर अल्पवयीन सूत्रधाराला नगर येथील बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. त्यानंतर आज पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकातील पोलिस कॉन्स्टेबल राहुल डोके आणि राहुल सारबंदे यांनी उमर सय्यद याच्या घराच्याजवळ पाळत ठेवून गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास फैय्याज कादर (वय २३, रा. मदिनानगर) याच्यासुद्धा मुस्क्या आवळल्या. त्यालाही न्यायालयाने १८ मार्चपर्यंत पोलिस कोठड सुनावली.

Web Title: Another person arrested in Sangamner mob beating case

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here