पतीनं पत्नीच्या हाताची नस कापली अन् पोटच्या लेकीच्या तोंडावर उशी दाबून संपवलं
Breaking News | Pune Crime: कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि मुलीचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर.
पुणे : पुण्यात पुण्यात कौटुंबिक वादातून हत्या केल्याचे प्रकारही सातत्याने समोर येत आहेत. एवढंच नाही तर घरातील वाद विकोपाला जाऊन थेट एकमेकांचा जीव घेण्याच्या घटना उघडकीस आल्या आहे. यातच आता दुहेरी हत्याकांडाने पुणे हादरलं आहे. कौटुंबिक वादातून पतीने पत्नी आणि मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कात्रज परिसरातून ही घटना समोर आली आहे. आज (16 मार्च) पहाटे ही घटना घडली आहे. निर्घृण हत्या करणारा पती स्वत:च पोलीस ठाण्यात हजर झाल्याचं समजत आहे.
श्वेता तळेवाले (वय 40), शिरोली तळेवाले (वय 16) अशी खून झालेल्या दोन जणींची नावे आहेत. याप्रकरणी अजय तळेवाले (वय 45) असे आरोपीचे नाव आहे. चाकूने वार करून आणि उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अजय हा फायनान्स एडव्हायजर म्हणून काम करीत होता. पती पुण्याचा तर पत्नी ही मुळची नागपूरची होती त्यासोबतच आर्थिक गोष्टींवरून दोघांमध्ये वाद होत होते.
श्वेता यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर श्वेताने अजयसोबत विवाह केला होता. श्वेताला पहिल्या पतीपासून मुलगी होती तर अजय आणि श्वेताला एक मुलगा आहे. त्या दोघांमध्ये अने दिवसांपासून वादावादी सुरु होती. हे वाद कायम विकोपाला जात असतं. ती सतत माहेरी निघून जाण्याची धमकी देत होती. हे सगळं पाहून याचा परिणाम मुलांवर होत होता.
आज पहाटे घरात सगळे झोपलो होते. त्यावेळी अजयचने पत्नी श्वेताच्या अंगावर चाकूने सापसप वार केले. हे पाहून श्वेताला जाग आली. जाग आल्याचं पाहताच पतीने तिच्या हाताची नस कापली आणि तिच्या तोंडावर उशी कोंबली. त्यानंतर मुलीच्या तोंडावर उशी दाबून तिचा देखील खून केला. सकाळी आठच्या सुमारास तो स्वत:च पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेने पुणे हादरलं आहे.
Web Title: husband cut the vein of his wife’s hand and ended by pressing a pillow over the face Murder
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study