अहिल्यानगर: कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा
Breaking News | Ahilyanagar Prostitution Business Raid: नगर पाथर्डी रोडवरील तिसगाव येधील विशाल लॉज येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यातर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा.
अहिल्यानगर नगर पाथर्डी रोडवरील तिसगाव येधील विशाल लॉज येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यातर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी छापा टाकला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण भाऊसाहेब माने (वय ३७, रा. ढवळेकडी, ता. पाथर्डी) असे गुन्हा दाखल झझालेल्या इसमाचे नाव आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी शहरासह जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अवैध धंद्याविरोधात गुन्हे शाखेने मोहीम उघडली आहे. तिसगाव (ता. पाथर्डी) परिसरातील विशाल लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकातील काही कर्मचारी बनावट ग्राहक बनून लॉजमध्ये गेले. त्यावेळी त्यांना तिथे काही महिला मिळून आल्या. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली.
लॉजची तपासणी केली असताना नारायण माने मिळून आला. त्याच्याकडून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे मोबाईल व दीन हजार रुपये रोख, असा एकूण ४२ हजाराचा मुद्देमाल अप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.
Web Title: Police raid on Ahilyanagar Prostitution Business