संगमनेर: महामार्गावर मोटारसायकल अपघातात संगमनेरचे दाम्पत्य ठार
Breaking News | Ahilyanagar Accident: कोपरगाव- संगमनेर महामार्गावर शहापूर शिवारात मालमोटर व मोटरसायकल अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.
कोपरगाव : कोपरगाव- संगमनेर महामार्गावर शहापूर शिवारात मालमोटर व मोटरसायकल अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. मृत पती पत्नी हे संगमेनर तालुक्यातील रहिवासी असल्याचे समजते.
सर्जेराव शांताराम सोनवणे (वय 40) आणि रुपाली सर्जेराव सोनवणे (वय 35, दोघेही रा. वेल्हाळे, संगमनेर) अशी पती-पत्नीची नावे आहेत.
कोपरगाव-संगमनेर हामार्गावरून मालमोटार (एचआर 74, बी6218) ही संगमनेरकडे जात होती. या मोलमोटारीने मोटरसायकलला (एमएच 15, इवाय 8098) पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत मोटरसायकलस्वार सर्जेराव शांताराम सोनवणे आणि त्यांची पत्नी रुपाली जागीच ठार झाले. सर्जेराव सोनवणे यांच्या डोक्यावरुन मालमोटारीचे चाक गेले, तर रुपाली सोनवणे यांच्या अंगावरूनही मालमोटार गेली.
शहापूरचे पोलीस पाटील भागवत खंडीझोड यांनी शिर्डी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. मालमोटार चालक घटना घडल्यानंतर पळून जाताना स्थानिकांनी त्यास पकडले. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Sangamner couple killed in motorcycle accident on highway