संगमनेर: नाशिक पुणे महामार्गावर दुचाकीस्वराचा अपघातात मृत्यू, उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून…..
Breaking News | Sangamner Accident: दुचाकीला मागून येणाऱ्या आयटेन कार चालकाने जोराची धडक दिली. कारची जोरात धडक बसल्याने वर्षे दुचाकी वरून उडून जवळून जात असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून झालेल्या अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू.
संगमनेर: दुचाकीला मागून येणाऱ्या आयटेन कार चालकाने जोराची धडक दिली. कारची जोरात धडक बसल्याने वर्षे दुचाकी वरून उडून जवळून जात असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून झालेल्या अपघातामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला.
नासिक पुणे बाह्यवळण मार्गावर कृष्णा लॉन्स जवळ शनिवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुदाम देवराम वर्षे (वय ४८ रा. चिकणी ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सुदाम वर्षे हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून (MH 17M 9879) पुण्याच्या दिशेने जात असताना कृष्णा लॉन्स जवळ त्यांच्या दुचाकी ला मागून येणाऱ्या आयटेन कार चालकाने जोराची धडक दिली. कारची जोरात धडक बसल्याने वर्षे दुचाकी वरून उडून जवळून जात असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडले. ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पळून गेला. दरम्यान अपघाताची माहिती समजताच संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली.
दरम्यान अपघातात मृत्यू झालेल्या वर्षे यांचा मुलगा शुभम सुदाम वर्षे याने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आयटेन कार चालक मुकेश दिनकर बहिरट (रा. काँग्रेस भवनाच्या मागे, शिवाजीनगर, पुणे) व अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १२७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), २८१, १२५(अ), १२५ (ब) मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४ (अ) (ब) नुसार गुन्हा दाखल केला असून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील अधिक तपास करत आहे.
Web Title: Biker dies in an accident, found under the wheels of a sugarcane tractor