अहिल्यानगर: मागील मृतदेह अनुत्तरीतच तेच आणखी एक मृतदेह आढळला
Breaking News | Ahilyanagar: मुळा नदीच्या पाण्यात अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ.
राहुरी : तालुक्याच्या पश्चिमेकडील आग्रेवाडी (म्हैसगाव) हद्दीमध्ये मुळा नदीच्या पाण्यात अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी (८) रोजी रात्री पाण्यात तरंगणाऱ्या मृतदेहाबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, राहुरी हद्दीत अनोळखी मृतदेह सापडण्याची मालिका सुरूच आहे. गेल्या २ वर्षांमध्ये या परिसरात आढळल्लया तब्बल १० मृतदेहांची ओळख पटविण्याची प्रतिक्षा असताना, पुन्हा यामध्ये भर पडून ११ वा अनोळखी मृतदेह आढळल्याने पोलिस प्रशासनापुढे तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
म्हैसगाव हद्दीत यापूर्वी अनोळखी व्यक्तीचा खून करुन, त्याचा मृतदेह मुळा नदीत फेकला होता. यानंतर शनिवारी रात्री मासेमार तरूण नदी पात्रात गेले असता, त्यांना मृतदेह दिसला. पाण्यात तरंगणाऱ्या या मृतदेहाबद्दल तरुणांनी ग्रामस्थांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक समाधान फडोळ, पोलिस नाईक रामनाथ सानप, पोलिस हवालदार अविनाश दुधाडे, वाहन चालक लक्ष्मण खेडकर यांनी रात्री ८.३० वाजता पाण्यातून मृतदेह बाहेर काढला.
पांढरा शर्ट व काळ्या रंगाची पैंट परिधान केलेल्या मृत तरुणाचे वय ४० असल्याचे समजले. दरम्यान, रविवारी (९) रोजी राहुरी येथे शवविच्छेदन गृहात मृतदेहाची शवविच्छेदन प्रक्रिया वैद्यकीय अधिकारी डॉ. मिसाळ यांनी पूर्ण केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेहाच्या शरीरावर जखमा नाहीत. चार-पाच दिवसांपासून मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे तरुणाने आत्महत्या केली की, त्याची कोणी हत्या केली, हे मात्र निश्चित समजू शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले.
तालुक्यातील बारागाव नांदूरगावात गेल्या वर्षी तरुणाचा निघूण खून करून, प्लॅस्टीकच्या पिपामध्ये त्याचा मृतदेह टाकण्यात आला होता. तो मृतदेह नेमका कोणाचा? हे अनुत्तरीतच आहेत. एवढेच नव्हे, तर गुहाहद्दीत नगर मनमाड रस्त्यालगत सापडलेला महिलेचा मृतदेह, राहुरी परिसरातच मजुराचा आढळलेला मृतदेह, आरडगाव-देसवंडी व राहुरी येथील मुळा नदी पात्रात सापडलेले मृतदेह अशा एकूण तब्बल १० मृतदेहांची ओळख पटली नसताना म्हैसगाव हद्दीत पुन्हा अनोळखी मृतदेह आढळल्याने संताप व्यक्त होत आहे.
Web Title: Another dead body was found after the previous body was unanswered
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News, Aj Smart News