पोलीस ठाण्याच्या आवारात गळफास घेणार्याकडे चिठ्ठी मिळून आल्याने खुलासा
अहमदनगर | Ahmednagar: कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारात गळफास घेणार्या फलटण (जि. सातारा) येथील सेवानिवृत्त एसटी कर्मचार्याचे शवविच्छेदन सुरू असताना एक चिठ्ठी मिळून आली आहे. आजारपणाला कंटाळून मी आत्महत्या करत असून माझ्या मुलाला एसटीमध्ये नोकरी द्यावी, असा त्यात उल्लेख असल्याचे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी सांगितले. मात्र त्याने कोतवाली पोलीस ठाण्याच्या आवारातच का गळफास घेतला याबाबतचे गौडबंगाल समजू शकले नाही.
फलटण येथील सेवानिवृत्त एसटी कर्मचारी ज्ञानेश्वर तुकाराम मराठे (वय 62) यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत बुधवारी कोतवाली पोलीस ठाणे आवारातील स्वच्छतागृहात मिळून आला होता. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. जिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन न्यायदंडाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी मराठे यांच्या कपड्यामध्ये एक चिठ्ठी मिळून आली. त्यामध्ये आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असून मुलाला नोकरी देण्यात यावी, असा उल्लेख केला असल्याचे निरीक्षक शिंदे यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अपडेट बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: संगमनेर अकोले न्यूज
Web Title: Ahmednagar Revealed after receiving the letter from the stranger