Accident: संगमनेर नाशिक पुणे महामार्गावर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी
संगमनेर | Accident: तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर माहुली फाटा येथे कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास घडला.
राजू वर्पे रा. वरवंडी ता. संगमनेर असे जखमी दुचाकीस्वराचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच डोळसने येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रमुख, पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. जखमी वर्पे यांना अमित विठ्ठल गाडेकर आणि गणेश संजय जाधव यांनी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या अपघाताबाबत घारगाव पोलिसांना कळविण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अपडेट बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: संगमनेर अकोले न्यूज
Web Title: Sangamner Accident Nasik pune Highway container and bike