Home औरंगाबाद शिर्डी बसस्थानक येथे एकटे बसलेल्या महिलेला लॉजवर नेऊन अत्याचार

शिर्डी बसस्थानक येथे एकटे बसलेल्या महिलेला लॉजवर नेऊन अत्याचार

Breaking News | Vaijapur Crime: ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या २९ वर्षीय पीडित महिलेवर राहाता येथील व्यक्तीने शिर्डीत येथे एक लॉजवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर.

Woman sitting alone at Shirdi bus stand taken to lodge and raped

वैजापूर: शहराजवळील ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या २९ वर्षीय पीडित महिलेवर राहाता येथील व्यक्तीने शिर्डीत येथे एक लॉजवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. चेतन प्रभाकर कोल्हे रा. खडकेवाके ता. राहाता जि. अहिल्यानगर असे आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन वैजापूर पोलीस ठाण्यात तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करुन वैजापूर पोलिसांनी अधिक तपासासाठी हा गुन्हा शिर्डी पोलीसांकडे सुपूर्द केला. अशी महिती वैजापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी दिली. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर शहराजवळील पीडित महिला तिच्या मैत्रिणी सोबत पंढरपूर दर्शनासाठी गेली होती, तिथून त्या दोघी बसद्वारे शिर्डी येथे पोहचल्या नंतर पीडितेची मैत्रीण ही तिच्या मूळ गावी निघून गेली.

त्यानंतर शिर्डी बसस्थानक येथे एकटे बसलेल्या पीडित महिलेला आरोपीने एका लॉजवर नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल केली.

Web Title: Woman sitting alone at Shirdi bus stand taken to lodge and raped

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here