Home अकोले अकोले परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी गारांचाही मारा

अकोले परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी गारांचाही मारा

Breaking News | Akole Rain: अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातही रविवारी अनेक भागात पावसासह गारपीट झाली. शेतशिवारात पाणी साचले आहे.

Heavy unseasonal rains, hailstorms also hit

अकोले : अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी व परिसरात रविवारी दुपारी सुमारे तासभर वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी तुरळक गारांही कोसळल्या.

धामणगाव आवारीसह घोरपडवाडी, तळेवाडी या परिसरात रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास तब्बल तासभर वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यावेळी अचानक आलेल्या या पावसामुळे शेतात काम करत असलेल्या शेतमजुरांची व शेतात साठवून ठेवलेल्या कांद्याची झाकणी करताना शेतकऱ्यांचीही एकच धांदल उडाली. जोरदार कोसळलेल्या या अवकाळी पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले. रस्ते

तसेच उताराला लागून असलेल्या शेताचे बांध पाण्याने भरून गेले. या पावसाने उन्हाच्या चटक्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना मात्र थंडावा मिळाला आहे.

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा १ ते २ अंश सेल्सिअसने उतरला आहे. मात्र, विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. पुढील एक ते दोन दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, अकोला येथे ४२.४ सर्वाधिक तापमान नोंदविले गेले. तर, जळगाव, नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी गारासह अवकाळी पाऊस झाला.

पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र, राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला. त्यामुळे काही भागांत पावसाचा अंदाज आहे. जळगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक आदी भागांतील कमाल तापमानाचा पारा काहीसा उतरला. सोलापूर अद्यापही ४० अंशाच्या पुढेच आहे. पुढील दोन दिवस नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागांत पावसाचा अंदाज आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात अनेक भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस झाल्याने केळींच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बागांमध्ये गारांचा खच पडला आहे.

जळगाव जिल्ह्यात रावेरनंतर चोपडा तालुक्यात रविवारी दुपारी दोन वाजता ढगांच्या गडगडाटासह पाऊस झाला, तर काही ठिकाणी गाराही पडल्या. गहू, केळी, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे.

जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी काढलेला मका पाण्यात वाहून गेला. धानोरा (ता. चोपडा) येथे रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एक तास पाऊस पडला. १२ मिनिटे गारपीट झाली.

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातही रविवारी अनेक भागात पावसासह गारपीट झाली. शेतशिवारात पाणी साचले आहे.

गेले दोन दिवस राज्यात झालेल्या हवामान बदलाचा फटका उत्तर महाराष्ट्राला बसला असून जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांची दाणादाण उडाली.

अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यात धामणगाव आवारी आणि परिसरात रविवारी दुपारी तासभर वादळासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

Web Title: Heavy unseasonal rains, hailstorms also hit

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here