Home अहिल्यानगर अहिल्यानगर: दोन मित्रांनी एकाच वेळी एकाच झाडाला गळफास घेत केली आत्महत्या

अहिल्यानगर: दोन मित्रांनी एकाच वेळी एकाच झाडाला गळफास घेत केली आत्महत्या

Breaking News | Suicide Case: एकाच दिवशी दोन्ही मित्रांनी आत्महत्या केल्याने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ.

Two friends committed suicide by hanging themselves from the same tree 

जामखेड : तालुक्यातील पिंपळगाव डंडा येथील दोन मित्रांनी एकाच दिवशी एकाच झाडाला गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे. एकाच दिवशी दोन्ही मित्रांनी आत्महत्या केल्याने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून तुषार अशोक ढंगे (वय २५ वर्ष), व सिकंदर सलाउद्दीन शेख (वय ३० वर्ष, दोघे रा. पिंपळगाव डंडा ता. जामखेड जि. अहिल्यानगर) अशो आत्महत्या केलेल्या तरुणांची नावे आहेत, या दोघांनीही पिपरी चिंचवड येवील भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील भारत माता चौका जवळील खिरीड बस्ती येथील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.

या घटनेप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील दोन तरुणांनी पिंपरी चिंचवड येथील मोशी एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन हद्दीतील भारत माता चौका जवळील खिरीड वस्ती येथील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. तुषार अशोक डगे आणि सिकंदर सलाउद्दीन शेख हे दोघे एकमेकांचे मित्र आहेत. ते जामखेड तालुक्यातील पिंपळगाव ठंडा येथील त्यांच्या मूळ गावावरून पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातील मोली येथील भारत माता चौक या ठिकाणी आले होते. पण आज त्या दोघांचे मृतदेह एकाच वेळी एकाच झाडाला लटकरलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. प्राथमिक तपासात त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.

या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पोलीस पुढील तपास करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच मगत तुषार हमे व सिकंदर सलाउद्दीन या दोघांचेही नातेवाईक जामखेड तालुक्यातील पिंपळगाव ठंडा वेधुन घटनास्थळी पोहचले आहेत. पोलिसांनकडुन त्यांच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली जात असुन दोघा मित्रांनी नेमकी आत्महत्या का केली याचे कारण शोधले जात आहे. संपूर्ण तपास केल्यानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे. या घटनेतील आत्महत्या केलेल्या तुषार अशोक ढगे हा अविवाहित आहे तर त्याचा दुसरा मित्र सिकंदर सलाउद्दीन शेख वाचे लग्न झालेले आहे. दोधा मित्रांनो एकाच वेळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Two friends committed suicide by hanging themselves from the same tree 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here