अहिल्यानगर: अल्पवयीन मुलीला पळवले
Breaking News | Ahilyanagar Crime: घरासमोरून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना समोर. ( abducted)
राहुरी : घरासमोरून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. घरा समोर अंगणात उभ्या असलेल्या अल्पवयीन मुलीला चारचाकी वाहनातून आलेल्या दोन तरुणांनी पळवून नेले.
नातेवाइकांनी त्यांचा पाठलाग केला; परंतु ते मुलीला घेऊन पसार झाले. ही घटना कात्रड परिसरात मंगळवारी (दि. १८) रात्रीच्या सुमारास घडली. मंगळवारी रात्री ती अंगणात होती. त्यावेळी दोन आरोपी वाहनातून आले आणि त्यांनी मुलीचे अपहरण केले.
Web Title: Rahuri minor girl was abducted