Home महाराष्ट्र ४ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, मृतदेह पेटीत लपविला

४ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या, मृतदेह पेटीत लपविला

Sangli Rape News: चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह पेटीत लपवला.

A 4-year-old girl was sexually assaulted and killed

 सांगली:  जिल्ह्यातून अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली. चार वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह पेटीत लपवला. याप्रकरणी पोलिसांनी एका नराधमाला अटक केली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

माहिती अशी की, सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील करजगे गावात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी पांडुरंग सोमनिंग कळळी पुजारीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी हा चिमुरडीच्या शेजारी राहतो. मिळालेल्या माहितीनुसार, चिमुरडी गुरुवारी सकाळपासून बेपत्ता होती. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. पंरतु, ती कुठेच सापडली नाही. यानंतर गावात दवंडी पिटवून शोध सुरू करण्यात आला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील शोध सुरू केला. त्यावेळी पोलिसांना आरोपी संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता एका पत्र्याच्या पेटीत मुलगी मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी आरोपीला खाक्या दाखवतात त्याने चिमुरडीची हत्या केल्याची कबूली दिली. हत्येआधी आरोपीने चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी चिमुरडीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच अनेक गोष्टी स्पष्ट होतील. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: A 4-year-old girl was sexually assaulted and killed

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here