विधानसभेनंतर आता पुन्हा एकदा बारामती पवार विरुद्ध पवार? दोन्ही अॅक्शन मोडमध्ये
Baramati Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकतीने लढण्यासाठी दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आमने-सामने येण्याच्या तयारीत. (Sharad Pawar vs Ajit Pawar)
बारामती: लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर बारामती पवार विरुद्ध पवार याचा पुढचा अध्याय पाहायला मिळणार आहे. बारामतीत पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांचे वेध लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकतीने लढण्यासाठी दोन्ही पक्ष पुन्हा एकदा आमने-सामने येण्याच्या तयारीत आहेत.
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना धूळ चारल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांच्या उमेदवाराला धूळ चारली त्यानंतर आता दोन्ही पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी सुरू झाली आहे. बारामतीत जय पवार आणि युगेंद्र पवार दौरे करताना दिसत आहेत.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून जय पवार हे बारामती तालुक्याचा दौरा करीत आहेत. या दौऱ्यामध्ये आभार दौरा जरी नाव असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा दौरा आहे. तर आगामी काळात नवीन चेहऱ्यांना संधी देऊ असं जय पवार म्हणतात.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्ष बांधणीवर भर दिला जातोय.. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना भरघोस यश मिळाल्यानंतर शरद पवारांकडून युगेंद्र पवार बारामती तालुक्यात दौरा केला. त्यामुळे विधानसभेचा विचार करता जास्तीत जास्त पक्ष बांधणीची गरज ही शरद पवारांच्या पक्षाला आहे.
अजित पवारांना मिळालेल्या यशानंतर बारामतीत अजित पवारांचा 22 तारखेला नागरी सत्कार करण्यात येणार आहे. एक प्रकारे या नागरी सत्कारात अजित पवार बारामती शक्ती प्रदर्शन करणार आहेत. लोकसभा विधानसभा निवडणुकीत नंतर दोन्ही पवार कुटुंबाच बारामतीतलं अस्तित्व टिकवण्यासाठी पुढचा पाठ पाहायला मिळणार यामध्ये काही शंका नाही.
Web Title: After the assembly now once again Baramati Sharad Pawar vs Ajit Pawar
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study