Home संगमनेर संगमनेर बसस्थानकात महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लांबविले

संगमनेर बसस्थानकात महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लांबविले

Sangamner Bus Stand ladies purse theft 

संगमनेर | Sangamner: संगमनेर बसस्थानकात बस मध्ये बसत असणाऱ्या महिलेच्या पर्समधून चोरट्याने सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.

याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात बुधवारी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधना अण्णासाहेब हासे रा. चिखली ता. संगमनेर या मह्लेने फिर्याद दिली असून यावरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. साधना हासे या मोशी ता. हवेली जि. पुणे येथे सध्या राहत आहे.

साधना हासे या पुणे येथे जाण्यासाठी संगमनेर बसस्थानक येथे आल्या होत्या. नाशिककडून आलेल्या बस मध्ये त्या बसत असताना त्यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने १६ हजार रुपये किमतीचे दागिने चोरले. याबाबत संगमनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: Sangamner Bus Stand ladies purse theft 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here