Home अकोले अकोले तालुक्यात ५२ ग्रामपंचायत निवडणुकीत ११५३ उमेदवार रिंगणात

अकोले तालुक्यात ५२ ग्रामपंचायत निवडणुकीत ११५३ उमेदवार रिंगणात

Gram Panchayat elections in Akole taluka

अकोले प्रतिनिधी: तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत आज शेवटच्या दिवशी तब्बल ७५७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असुन ५२ ग्रामपंचायतीत एकुण ११५३ उमेदवारांनी अर्ज आले असून आता ४ जानेवारी रोजी माघारीची शेवट असल्याने त्यानंतर निवडणूक लढतीचे चिञ स्पष्ट होईल.

अकोले तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे येत्या १५ जानेवारी रोजी ५२ ग्रामपंचायतीचे मतदान होत असुन अकोले तहसिल कार्यालयात २३  डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली होती. २४ डिसेंबरला  ११ व २८ डिसेंबरला ७३ ,तसेच मंंगळवार २९ डिसेंबर ला ३१२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते तर आज शेवटच्या दिवशी बुधवारी सायंकाळपर्यत  ७५७ अर्ज दाखल झाल्याने आता ५२ ग्रामपंंचायतीत एकुुुण ११५३ उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत उदया दि ३१ डिसेंबर रोजी अर्जाची छानणी होणार आहे.तर अर्ज माघारी घेण्याची शेवट मुदत ४ जानेवारी आहे त्यानंतर ५२ग्रामपंचायतीत किती ग्रामपंचायत बिनविरोध होणार व किती जागी कशी निवडणुक लढत होईल हे स्पष्ट होईल

गावनिहाय एकुण दाखल झालेले  उमेदवारी अर्ज पुढीलप्रमाणे —-

सुगाव खुर्द  २५, अंबड २८, कळस  बुद्रुक ३२,लिंगदेव ३४, जांभळे १२, उंचखडक बुद्रुक २६, ढोक्री ३७, निळवंडे ०७ ,कळस खु २४, चैतन्यपुर ०६, टाकळी २८, कळंब १३, धामणगाव आवारी ४८, हिवरगाव ३२, आैरंगपुर ०८, ब्राम्हणवाडा ३५, बेलापुर २८, गणोरे ४७, पांगरी १७ ,चितळवेढे ११, रुभोडी ३२, धुमाळवाडी ४४, बहिरवाडी ०८, वाघापुर १९ ,कोतुळ ६०, उंचखडक खुर्द ०९, बदगी १४, इंदोरी १५, परखतपुर १६,,मेहंदुरी ३७, भोळेवाडी ०४, नवलेवाडी १८, पिंपळगाव निपाणी २०, बोरी १४,वाशेरे २३, शेरणखेल ०७, घोडसरवाडी ०१, नाचणठाव ११, निंब्रळ १८, जाचकवाडी ०६,म्हाळादेवी ०७,लहीत बुद्रुक १७, पिंपळगाव खांड २६, मोग्रस ०७,पिंपळदरी २६, मनोहरपुर १४,तांभोळ १६,कुंभेफळ ३३, मन्याळे १५ धामणगाव पाट १७, विरगाव ३३  ,देेेवठाण ६८ अशी एकुण ११५३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

Web Title: Gram Panchayat elections in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here