Home अहिल्यानगर अहिल्यानगर: तरुणाचे टोकाचे पाऊल! एका ओळीच्या चिठ्ठीने खुलासा

अहिल्यानगर: तरुणाचे टोकाचे पाऊल! एका ओळीच्या चिठ्ठीने खुलासा

Breaking News | Ahilyanagar: एसटी आरक्षणासाठी वंजारी समाजातील युवकाची आत्महत्या.

Youth from Vanjari community commits suicide for ST reservation

शेवगाव : ‘आमच्या जातीचे काही खरे नाही, मी स्वतःला संपवतो..’ अशी चिठ्ठी लिहून २० वर्षीय वंजारी समाजातील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कोनोशी (ता. शेवगाव) येथे गुरुवारी सकाळी ही घटना समोर आली. अमोल दौंड असे मृत युवकाचे नाव आहे.

तालुक्यातील थाटे-वाडगाव येथे मागील नऊ दिवसांपासून वंजारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. मात्र, या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करीत असून, वंजारी समाजाला आरक्षण मिळत नसल्याने उद्विग्न होऊन अमोल दौंड याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले. दरम्यान, याबाबत माहिती मिळताच शेवगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण महाले, पोलिस नाईक ईश्वर गर्जे, कॉन्स्टेबल गणेश बांगर, कॉन्स्टेबल अर्जुन ढवळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.

संतप्त नातेवाइकांनी तहसीलदारांच्या उपस्थितीत मृतदेह खाली घेऊन तपासणी करण्याची मागणी लावून धरली. अखेर शेवगावचे तहसीलदार आकाश दहादडे हे घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह खाली घेण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर दुपारी अमोल दौंड याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आंदोलनाची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी बोधेगाव येथे मंगळवारी (दि. ७) तीन तास रास्ता रोको आंदोलनही केले होते. मात्र, त्यानंतरही तोडगा निघाला नाही. त्यामुळे निराश झालेल्या अमोल दौंड याने बुधवारी (दि. ८) रात्री कोनोशी येथील घरी गळफास घेऊन आपले जीवन संपविले. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

आई-वडील करतात ऊसतोडणी, भाऊ आजारी

मृत अमोल दौंड याचे आई-वडील ऊसतोडणीचे काम करतात. आई-वडिलांना कामात मदत करण्यासाठी काही वर्षापूर्वी अमोलने ट्रॅक्टर घेतला होता. त्याला एक लहान भाऊ असून, तोही आजाराने त्रस्त आहे. दौंड कुटुंब भूमिहीन असून, त्यांना शासनाने भरीव मदत करावी, अशी मागणी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र दौंड यांनी केली आहे.

Breaking News: Youth from Vanjari community commits suicide for ST reservation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here