Home अहिल्यानगर अहिल्यानगर: मुलींची छेड काढून व्हिडीओ प्रसारित; दोघे गजाआड

अहिल्यानगर: मुलींची छेड काढून व्हिडीओ प्रसारित; दोघे गजाआड

Breaking News | Ahilyanagar Crime: मुलींची टिंगलटवाळी करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी गजाआड.

Video of girls being teased circulated two arrested

श्रीरामपूर : श्रीरामपूरहून लोणीला महाविद्यालयात आलेल्या मुलींची टिंगलटवाळी करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याविरुद्ध लोणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये शाहिद हुसेन शेख (वय २१), सात हशम सय्यद (२०) या दोघांचा समावेश आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या प्रकरणाची माहिती दिली. अशाप्रकारे मुलींची छेड काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

शनिवारी (दि. ४) श्रीरामपूर येथून दोन तरुण लोणी परिसरामध्ये गेले होते. तेथे त्यांनी एक व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड केला होता. व्हिडीओमध्ये हे दोन्ही तरुण श्रीरामपूरवरून लोणी येथे महाविद्यालयात मुलींची छेड काढत तसेच त्याबाबत परस्परांशी बोलत असल्याचे दिसून येत आहे. त्यांचा उद्देश हा केवळ मुलींची छेड काढणे, हा असल्याचे व्हिडीओवरून दिसून आले. त्यानंतर पोलिस त्यांचा शोध घेत होते. अखेर दोघेही पोलिसांना मिळून आले. दोघाही आरोपींचे मोबाइल तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्यांनी बेकायदेशीर वर्तनाची माफीदेखील मागितल्याचा व्हिडीओ प्रसारित केलेला आहे.

Breaking News: Video of girls being teased circulated two arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here