टेम्पो व दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू
Pathardi Accident: टेम्पो व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू.
पाथर्डी: तालुक्यातील भुतेटाकळी शिवारात टेम्पो व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीवरील राहुल रावसाहेब फुंदे (वय ३६, रा. भुतेटाकळी) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. २) रात्री घडली. या वेळी अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला.
राहुल फुंदे हा तरुण रविवारी रात्री नेहमीप्रमाणे टाकळी फाटा येथून भुतेटाकळी येथील घराकडे दुचाकीने जात असताना सुताराचा मळाजवळील असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर खरवंडी कासारकडून पाथर्डीकडे येणाऱ्या टेम्पोने फुंदे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
नवीन अधिक जलद बातमी मिळविण्यासाठी आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज
या धडकेत फुंदे याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली होती. या वेळी फुंदे याच्या डोक्यातून व पायातून मोठा रक्तस्राव झाला होता. या वेळी त्यांना तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या वेळी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर राहुल फुंदे याला मृत घोषित केले. राहुल फुंदे यांच्या वडिलांचेही एक वर्षापूर्वी निधन झाले आहे. राहुल याच्यामागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
Web Title: Youth dies in tempo and bike accident