Home भंडारा मुलीसोबत खेळण्यासाठी घरी आलेल्या बालिकेवर वकिलाकडून अत्याचार

मुलीसोबत खेळण्यासाठी घरी आलेल्या बालिकेवर वकिलाकडून अत्याचार

Bhandara Crime: मुलीसोबत खेळण्यासाठी घरी आलेल्या एका ११ वर्षाच्या बालिकेशी खोटे बोलून आत बोलावले आणि लैंगिक अत्याचार केला.

girl who came home to play with a girl was abused by a lawyer

भंडारा : मुलीसोबत खेळण्यासाठी घरी आलेल्या एका ११ वर्षाच्या बालिकेशी खोटे बोलून आत बोलावले आणि लैंगिक अत्याचार केला. बालिकेने घरी जाऊन आपल्या आईला आपबिती सांगितल्यावर सोमवारी रात्री उशिरा तक्रारीनंतर एकाला अटक करण्यात आली. विजय रेहपाडे (४८) असे या नराधम आणि विकृत वकिलाचे नाव असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय तक्रारदार महिला भंडारा येथे राहते. तिची मुलगी ३ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शाळेतून घरी आली. संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास खेळण्यासाठी मैत्रिणीकडे गेली.

यावेळी मैत्रिणीचे वडील अॅड. विजय रेहपाडे हा घरीच होता. तुझी मैत्रीण आत बेडरूममध्ये खेळत आहे, असे खोटे सांगून त्याने तिला बेडरूममध्ये पाठविले. त्यानंतर पाठोपाठ जाऊन बेडरूममधील लाइट बंद केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित बालिकेने कशीबशी त्याच्यापासून स्वतःची सुटका करून घेत संध्याकाळी ७:३० च्या सुमारास रडत स्वतःचे घर गाठले. आईने रडण्याचे कारण विचारले, तेव्हा तिने आपबिती सांगितली.

आईने मुलीसह भंडारा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर रात्री पोलिसांनी वकिलाच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेतले आणि अटक केली.

Web Title: girl who came home to play with a girl was abused by a lawyer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here