Home Suicide News Suicide: तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

Suicide: तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

Young woman commits suicide due to youth harassment

अहमदनगर | Suicide: सातत्याने लग्नाची मागणी करणार्‍या तरूणाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने विषारी औषध प्राशन  करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एका तरूणाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त, विनयभंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आबीद पापाभाई मोमीन शेख ऊर्फ मुन्ना शेख (रा. नालेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गेल्या वर्षापासून मुन्ना शेख हा पिडीत मुलीला त्रास देत होता. शेख याने पिडीत मुलीचे मोबाईलमध्ये फोटो काढून लग्नाची मागणी केली होती. या तरुणाच्या जाचास कंटाळून तरुणीने आपले जीवन संपविले.

तिच्या कुटुंबियांनी व नागरिकांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी मागणी केली. कोतवाली पोलिसांनी जिल्हा रूग्णालयात जावून मयत मुलीच्या कुटुंबियांशी चर्चा केली. तसेच याबाबत तातडीने गुन्हा दाखल करण्यात येईल व आरोपीचा शोध घेण्यात येईल, असे सांगितले. अखेर आरोपी तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहे.

Web Title: Young woman commits suicide due to youth harassment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here