Home अहिल्यानगर अहिल्यानगर: मुलगी पेपरला गेली ते आलीच नाही, अपहरण

अहिल्यानगर: मुलगी पेपरला गेली ते आलीच नाही, अपहरण

Breaking News | Ahilyanagar: बारावीचा पेपर संपल्यानंतर परिक्षा केंद्राच्या बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचे (वय १७) कोणीतरी अपहरण केल्याची घटना.

girl went to the paper and never came, she was kidnapped

नगर :  बारावीचा पेपर संपल्यानंतर परिक्षा केंद्राच्या बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचे (वय १७) कोणीतरी अपहरण केल्याची घटना शहरातील तारकपूर परिसरात घडली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा शनिवारी (दि. ८) दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी (दि. ७) सकाळी १० वाजता फिर्यादीची अल्पवयीन मुलगी बारावीच्या परीक्षेसाठी शहरातील एका कॉलेजमध्ये गेली होती.

त्या दिवशी तिचा पेपर सायंकाळी सहा झाला. मात्र, ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तातडीने कॉलेज गाठले असता शिक्षकांनी तिने पेपर दिल्याचे सांगितले.  तिचा नातेवाई, मैत्रिणीकडे शोध घेण्यात आला मात्र, ती मिळून आली नाही. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

Web Title: girl went to the paper and never came, she was kidnapped

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here