संगमनेर: ‘वाघीण’ लढली बिबट्याशी, मृत्यूच्या दाढेतून पतीचे वाचविले प्राण
Breaking News Sangamner: बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ गंभीर जखमी झाल्याची घटना.
संगमनेर: तालुक्यातील चंदनापुरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.6) मध्यरात्रीनंतर एक ते दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तातडीने परिसरात दोन पिंजरे लावले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, की चंदनापुरी गावांतर्गत असलेल्या कारवस्ती येथे मेंढपाळ चंदू पुंजा दुधवडे व त्यांची पत्नी नंदा दुधवडे गुरुवारी रात्री मुक्कामी होते. पहाटेच्या वेळी बिबट्याने वाघुरीत घुसून मेंढ्यांवर हल्ला केला. त्यामुळे चंदू व त्यांची पत्नी नंदा हे दोघेजण झोपेतून जागे झाले.
यावेळी चंदू हे जवळ गेले असता बिबट्याने थेट त्यांच्यावरही हल्ला (Attack) केला. हल्ल्यात चंदू दुधवडे यांच्या दोन्ही हातांना गंभीर जखमा झाल्या. दुधवडे यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. आजूबाजूच्या शेतकर्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली आणि चंदू दुधवडे यांना औषधोपचारांसाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
नवीन अधिक जलद बातमी मिळविण्यासाठी आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज
चंदनापुरी येथे मध्यरात्री बिबट्या मेंढ्यांच्या वाघुरीत घुसला… एका मेढीचा फडशा पाडला… ओरडण्याच्या आवाजाने मेंढपाळ धावत गेला… त्याच्यावरही बिबट्याने झडप घातली. हाताचा चावा घेतला… नरडीचा घोट घेणार, तोच त्याची अर्धागिणी धावली… पतीच्या प्राणासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती… बिबट्याच्या मानगुटीवर बसून तिने त्याचे तोंड काठीने झोडले… ही सुमारे एक तासाची झुंज, थरार अंगावर शहारे आहेत. पतीचे प्राण वाचविण्यासाठी तिने दिलेल्या झुंजीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत माहिती अशी: चंदू व त्यांची पत्नी नंदा कारवस्ती परिसरात मेंढ्या चारत होते. बुधवारी सायंकाळी त्यांनी आपल्या सर्व मेंक्या वाघुरात बंद केल्या. रात्री जेवण करून हे दाम्पत्य झोपी गेले. पहाटेच्या सुमारास एक ते दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने थेट झेप घेत वाघुरात प्रवेश केला. एका मेंढीवर हल्ला केला. सर्वच मेंढ्यांचा जोराने ओरडण्याचा आवाज आला
झडप मारली. त्यांना खाली पाडले. त्यांचा चावा घेत असताना मी बिबट्याचे शेपूट ओढत होते. पतीचा गळा धरण्याचा प्रयत्न तो करीत होता. मी बिबट्याच्या अंगावर झेप घेत, त्याच्या तोंडावर काठीने मारा केला. त्याने मलाही जोराचा पंजा मारला. मी हटले नाही. त्याला मारतच होते. अखेर सुदैवाने आमच्या दोघांचेही प्राण वाचले.
बिबट्याने हल्ला केल्याची माहिती समजताच पहाटे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नामदेव ताजणे यांच्यासह आम्ही सर्वजण घटनास्थळी गेलो होतो. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आम्ही त्या परिसरात दोन पिंजरे लावले आहे. यासाठी आम्हाला नागरिकांचे मोठे सहकार्य मिळत आहे. सकाळीही घटनास्थळी जाऊन बिबट्याने फडशा पाडलेल्या मेंढीचा पंचनामा केला आहे.
Web Title: Tigress’ fought with leopard, saved husband’s life from death