Home क्राईम दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून तरुणाची गोळ्या झाडून हत्या, खळबळजनक घटना

दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरून तरुणाची गोळ्या झाडून हत्या, खळबळजनक घटना

Breaking News | Yavatmal Crime: वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरुन देशी कट्ट्यातून गोळी झाडून (Firing) युवकाची हत्या (Shot Dead) केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

young man was shot dead due to a cut on his bike

यवतमाळ : वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरुन देशी कट्ट्यातून गोळी झाडून युवकाची हत्या केल्याची  खळबळजनक घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास येथील कळंब चौक परिसरात घडली. यावेळी संतप्त जमावाने आरोपीची दुचाकी जाळून टाकली.

शादाब खान रफीक खान (रा. तायडे नगर) असे मयताचे नाव आहे. मनीष सागर शेंद्रे (रा. सेजल रेसिडेन्सी, अंबिका नगर यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

याबाबत माहिती अशी की, मंगळवारी रात्री आरोपी मनीष शेंद्रे हा कळंब चौक परिसरातून दुचाकीवर मैत्रिणीसह जात असताना शादाब खान रफीक खान यास वाहनाचा कट लागला. त्यामुळे आरोपी व शादाब यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपी मनीषने घरी जाउन देशी कट्टा आणला. तो परत कळंब चौक येथे आला. त्याच्या पाठोपाठ त्याची मैत्रीणसुध्दा आली. यावेळी आरोपीने तुम्ही मला व माझा मैत्रीणीला शिवीगाळ का केली, असा प्रश्न करत शादाब खान याला यास जाब विचारला. तेव्हा मयत शादाब व आरोपी यांच्यामध्ये वाद झाला. आरोपी मनीष शेंद्रे याने त्याच्या जवळच्या देशी कट्टयातून शादाब खान याच्यावर गोळी झाडली. त्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. शादाब खान रफीक खान याच्या छातीत गोळी लागली. त्याला शासकीय रूग्णालय यवतमाळ येथे भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शादाब खान याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी मनीष शेंद्रे यास ताब्यात घेतले आहे.

Web Title: young man was shot dead due to a cut on his bike

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here