अहिल्यानगर: कंपनीच्या साईटवर जाऊन तरुणाची आत्महत्या
Breaking News | Ahilyanagar Suicide: झेन इलेक्ट्रीकल (व्हीडिओकॉन) कंपनीच्या साईटवर तरूणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना.
अहिल्यानगर : एमआयडीसी परिसरातील झेन इलेक्ट्रीकल (व्हीडिओकॉन) कंपनीच्या साईटवर तरूणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना १७एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. ज्ञानदेव मुरलीधर खंडागळे (वय ३८, रा. तपोवन रस्ता, सावेडी) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानदेव खंडागळे यांनी झेन इलेक्ट्रीकल (व्हीडिओकॉन)
कंपनीच्या साईटवर गळफास घेतल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील कामगार प्रशांत देठे यांनी त्यांना उपचारासाठी रूग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टर डॉ. विशाखा शिंदे यांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती पोलीस अंमलदार गोर्डे यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस अंमलदार चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Young man commits suicide after visiting company’s