Home पुणे येरवाड्यात सराईत गुन्हेगारावर सपासप वार करीत हत्या

येरवाड्यात सराईत गुन्हेगारावर सपासप वार करीत हत्या

Breaking News | Pune Crime: सराईत गुन्हेगाराची निघृण हत्या  पुणे शहरातील येरवडा परिसरातून धक्कादायक घटना.

Yerwada, a criminal was killed by stabbing a criminal

पुणे: एका सराईत गुन्हेगाराची निघृण हत्या  पुणे शहरातील येरवडा परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सुधीर गवस उर्फ बाळू गवस (वय 25 वर्षे) असे मृत व्यक्तीचं नाव असून तो काही दिवसांपूर्वी येरवडा तुरुंगातून बाहेर आला होता. सुधीर गवस यांची बुधवारी (17 जुलै) मध्यरात्री धारदार शस्त्राने भोसकून निघृणपणे हत्या करण्यात आली. सुधीर गवस याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. सुधीर गवस याची हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे समजते. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  सुधीर गवस हा सराईत गुन्हेगार होता. तो येरवडा येथील जयप्रकाश नगरात राहत होता. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्याची येरवडा तुरुंगातून सुटका झाली होती. मात्र, आचार्य कुटुंबासोबत त्याचे पूर्वीपासून वाद सुरू होते. सुधीर आणि आचार्य कुटुंबीयांमध्ये मंगळवारी कडाक्याचे भांडण झालं होतं. वाद विकोपाला जाऊन बुधवारी (17 जुलै) मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास सुधीर गवस यांची धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी प्रवीण रामचंद्र आचार्य, स्वप्निल प्रवीण आचार्य आणि रविकिरण रामचंद्र आचार्य यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सुधीर आणि आचार्य कुटुंबीयांमध्ये मंगळवारी कडाक्याचे भांडण झालं होतं. वाद विकोपाला गेला. मारेकरी प्रवीण रामचंद्र आचार्य, स्वप्निल प्रवीण आचार्य आणि रविकिरण रामचंद्र आचार्य हे तिघे सुधीरवर तुटून पडले. अखेर सुधीर याने तिथून पळ काढला. तिघे मारेकरी सुधीरचा पाठलाग करत होते. अखेर सुधीर हा येरवडा परिसरातील एका दुकानामागे लपल्याचे मारेकऱ्यांना समजते. मारेकऱ्यांनी सुधीरला पकडून त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. सुधीरचा जागेवरच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी प्रवीण रामचंद्र आचार्य, स्वप्निल प्रवीण आचार्य आणि रविकिरण रामचंद्र आचार्य या तिघांना अटक केली आहे. येरवडा पोलिसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर गवसचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Yerwada, a criminal was killed by stabbing a criminal

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here