Home पुणे अल्पवयीन मुलींची मद्य पार्टी; नशेत घेतला गळफास

अल्पवयीन मुलींची मद्य पार्टी; नशेत घेतला गळफास

Breaking News | Pune Suicide: दोन मैत्रिणींनी घरी मद्य पार्टी केली. मात्र, त्यातील एका मुलीची ही पार्टी अखेरची ठरली. तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर.

underage girls' booze party Hanged himself drunk

पुणे : येरवडा भागातील दोन मैत्रिणींनी घरी मद्य पार्टी केली. मात्र, त्यातील एका मुलीची ही पार्टी अखेरची ठरली. तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर दुसरी मैत्रीण अति मद्य सेवनामुळे बेशुद्धावस्थेत आढळली. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. येरवडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात राहणारी १६ वर्षीय मुलगी अकरावीत शिकत होती. तिची आई भाजी विक्रीचा व्यवसाय करते. सोमवारी सायंकाळी या मुलीच्या घरी ती व तिच्या मैत्रिणीने मद्य पार्टी केली. यानंतर तिच्या मैत्रिणीने रात्री आठच्या सुमारास शेजारच्या मुलाला दूरध्वनी करून बोलावून घेतले. मुलगा घरी आला. त्याने घरात डोकावून पाहिले असता, मुलीने गळफास लावल्याचे दिसून आले. त्याने मुलीला खाली उतरविले. चेहऱ्यावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्याने मुलीच्या आईला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता. मुलीने आत्महत्या का केली, तसेच तिने कधी गळफास लावला, याबाबतची माहिती समजू शकली नाही.

Web Title: underage girls’ booze party Hanged himself drunk

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here