धक्कादायक! लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर लैंगिक अत्याचार; निर्जनस्थळी नेलं अन्…
Breaking News | Amravati Crime: एका महिलेवर लिफ्ट देण्याच्या आमिषाने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अमरावती : एका महिलेवर लिफ्ट देण्याच्या आमिषाने लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दवाखान्यात जाणाऱ्या एका महिलेला लिफ्ट देऊन तिला एका निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. या घटनेची तक्रार पीडित महिलेने रविवारी (दि.14) चिखलदरा पोलिस ठाण्यात केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी सुरेश गणाजी जावरकर (32, रा. धार, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, 31 वर्षीय महिला ही तिच्या घरासमोर उभी असताना तिच्या माहेरच्या परिचयातील सुरेश नामक तिच्या घराजवळच दुचाकी घेऊन आला. त्याने लिफ्ट देऊ का असे विचारले. त्यावेळी महिलेने दवाखान्यात जात असल्याचे त्याला सांगितले. त्यावेळी सुरेशने महिलेला दवाखान्यापर्यंत सोडून देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसविले. त्यानंतर त्याने दवाखान्यापर्यंत दुचाकी नेली. मात्र, तेथे न थांबता महिलेला पुढे घेऊन गेला.
जबरदस्ती महिलेला एका शेतात नेले आणि तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केला. या प्रकारानंतर पीडित महिलेने या घटनेची माहिती मोबाइलवरूनच पतीला दिली आणि त्यांना बोलावून घेतले. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Sexually assaulting a woman on the pretext of giving a lift
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study