Home Accident News नाशिक-पुणे महामार्गावरील कंटेनर उलटल्याने रिक्षाचा चक्काचूर; महिला ठार

नाशिक-पुणे महामार्गावरील कंटेनर उलटल्याने रिक्षाचा चक्काचूर; महिला ठार

Sinnar Accident: कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रिक्षावर उलटला. या भीषण अपघातात ब्राह्मणगाव येथील एक महिला ठार.

woman was crushed to death by a rickshaw when a container overturned on the Nashik-Pune Highway Accident

सिन्नर: नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी गावाजवळ भरधाव कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर रिक्षावर उलटला. या भीषण अपघातात ब्राह्मणगाव येथील एक महिला ठार झाली, तर दोन जण जखमी झाले. पुणे महामार्गावर शुक्रवारी (दि. २२) दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून, कंटेनर रिक्षावर उलटल्याने अपघातात रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावर मोहदरी गावाजवळ भरधाव कंटेनर रिक्षावर उलटल्याने मंदाकिनी बाळासाहेब रामराजे (वय ५५, रा. ब्राह्मणवाडे, ता. सिन्नर) यांचा मृत्यू झाला आहे, तर रिक्षाचालक शिवाजी मनोहर रामराजे (वय ५२) व आशा विजय रामराजे (वय ५२, दोघेही रा. ब्राह्मणवाडे) जखमी झाले आहेत. शिवाजी रामराजे सिन्नर येथील काम आटोपून शिंदेमार्गे ब्राह्मणवाडे येथे घराकडे निघाले होते; परंतु रस्त्याच अपघात झाला.

त्यांची रिक्षा (क्र. एमएच १५ जेए २०६४) व कंटेनर (क्र. एमएच ४६ एफ १२०९) हे सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. सिन्नरकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो रिक्षावर उलटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की कंटनेर रिक्षावर उलटल्याने रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, सिन्नर एमआयडीसी पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या अपघातात शिवाजी रामराजे यांच्या डोक्याला मार लागला असून, त्यांचा पाय फॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर आशा रामराजे किरकोळ जखमी झाल्या असून, उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

Web Title: woman was crushed to death by a rickshaw when a container overturned on the Nashik-Pune Highway Accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here