Home महाराष्ट्र पतीच्या अनैतिक संबंधांमुळे पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

पतीच्या अनैतिक संबंधांमुळे पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

Wife Suicide:  वसईतील महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टर डेलिसा परेरा असे ३९ वर्षीय मयत महिलेचे नाव आहे. त्या कार्डिनल ग्रेशिअस रुग्णालयात कार्यरत होत्या. राहत्या घरी गळफास घेत डॉ. डेलिसा यांनी आयुष्याची अखेर केली आहे.

wife due to her husband's immoral relations

विशेष म्हणजे नुकतीच त्यांनी मिसेस इंडिया स्पर्धेच्या अंतिम फेरीत चमकदार कामगिरीही केली होती. एका यशस्वी डॉक्टर महिलेने आत्महत्या का केली? त्याचं राज एका चिठ्ठीत बंद होतं. ही चिठ्ठी आत्महत्ये पूर्वी डॉक्टर डेलिसा यांनी चर्चच्या फादरीकडे दिली होती. ती चिठ्ठी ज्या वेळी फादरने डेलिसा यांच्या आईकडे दिली त्यानंतर या संपुर्ण प्रकरणावरचा पडदा उठला.

वसईतील कार्डिनल ग्रॅसियास रुग्णालयातील महिला डॉक्टर डेलिसा परेरा यांनी गळफास लावून आत्महत्या केली. डॉक्टरने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, तिच्या पतीचे अनैतिक संबंध आहेत आणि तो तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करतो. या घटनेनंतर पोलिसांनी बुधवारी रात्री डेलिसा परेराचा पती रॉयल परेराला आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली.

वसई येथील रहिवासी असलेल्या ३९ वर्षीय डॉ. डेलिसा परेरा या त्यांच्या पती रॉयल परेरा आणि १२ वर्षांच्या मुलीसह पापरी येथील सोनारभाट येथे राहत होत्या. ही महिला वसईतील बंगाल येथील प्रसिद्ध कॅडन्स ग्रेशियस हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करत होती. सोमवारी संध्याकाळी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी, ती पापडी येथील एका चर्चमध्ये मस्सा (प्रार्थना) करण्यासाठी देखील गेल्या होत्या. तसेच घरी जाण्या आधी त्या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी गेल्या. प्रार्थना झाल्यानंतर त्यांनी पापडी चर्चच्या फादरींना एक लिफाफा दिला. त्यात एक चिठ्ठी होती. तो लिफाफा देवून त्या घरी गेल्या. घरी गेल्यानंतर त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळानंतर कुटुंबीय घरी आल्यानंतर त्यांनी डेलिसा यांनी आपले जिवन संपवले असल्याचे दिसले. त्यांना ते पाहून धक्का बसला.फादरीं यांनी ही चिठ्ठी मृताच्या आई डॉ. डेलिसा परेरा यांना दिली. या संदर्भात त्यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पती रॉयल परेराचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. ज्यामुळे तो डॉ. डेलिसाचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा. नोटमध्ये अँडेलिसाने लिहिले आहे की २६ नोव्हेंबर २०२४ ते ६ जानेवारी २०२५ दरम्यान रॉयलने तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले. या प्रकरणात वसई पोलिसांनी आरोपी रॉयलविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०८, ११५ (२) ३५१ (३) अंतर्गत आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती देताना वसई पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी बाळकृष्ण घाडीगावकर म्हणाले की, सुसाईड नोटच्या आधारे आम्ही आरोपी रॉयल परेरा याला अटक केली आहे.

Web Title: wife due to her husband’s immoral relations

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here