धक्कादायक! तरुणाचा दगडाने ठेचून निर्घुण खून, अहिल्यानगरची घटना
Breaking News | Ahilyanagar Crime: बोल्हेगाव फाटा परिसरात एका ३६ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना.
अहिल्यानगर: नगर-मनमाड महामार्गावर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोल्हेगाव फाटा परिसरात एका ३६ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून (Murder) करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
ही घटना शनिवारी (११ जानेवारी) सकाळी उघडकीस आली असून खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मयत व्यक्तीचे नाव अश्विन मारुती कांबळे (वय 36, रा. जत्राड, तालुका निपाणी, जि. बेळगाव; हल्ली रा. गणेशनगर, नागापूर) असे आहे.
बोल्हेगाव फाटा परिसरात स्वराज ट्रॅक्टर शोरूमच्या बाजूला असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये ही घटना घडली.घटनेची माहिती कळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले.
Web Title: A young man was crushed to death by a stone
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News