महाराष्ट्रात कुणाच सरकार स्थापन होणार? एक्झिट पोल आला समोर
Assembly Election 2024: ELECTORAL EDGE यांचा महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी केलेला एक्झिट पोल समोर आलाय.
Vidhansabha Election 2024: महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. त्यानंतर आता एक्झिट पोल समोर आले आहेत. ELECTORAL EDGE यांचा महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी केलेला एक्झिट पोल समोर आलाय.
त्यानुसार महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा अंदाजही यामधून वर्तवण्यात आला आहे.
ELECTORAL EDGE च्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. भाजपने सर्वाधिक १४८ जागांवर उमेदवार उभे केलेले आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपला ७८ जागा मिळू शकतात. २०१९ च्या तुलनेत भाजपच्या २७ जागा कमी होत असल्याचे दिसतेय.
ELECTORAL EDGE च्या अंदाजानुसार, राज्यात महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. महाविकास आघाडीला राज्यात १५० जागांवर यश मिळेल असा अंदाज वर्तवलाय. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला ६० जागा मिळतील असा अंदाज आहे. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४६ आणि शिवसेना ठाकरे गटाला ४४ जागांवर यश मिळेल.
महायुतीकडून सरकार जाईल असा अंदाज ELECTORAL EDGE यांनी व्यक्त केला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपला ७८ जागा मिळतील. तर शिवसेना शिंदे गटाला फक्त २६ जागांवर समाधान मानावे लागले. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त १४ जागा मिळतील, असा अंदाज आहे.
अपक्ष आणि इतर पक्षाला राज्यात २० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंडखोरांमुळे राज्यातील समिकरण बदलेलं असा अंदाज आहे.
ELECTORAL EDGE च्या अंदाजानुसार, भाजपला २४ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस १७ टक्के मते घेऊ शकते. शिवसेनेला १० आणि ठाकरे गटाला १५ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १४ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त ६ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
अपक्ष आणि इतर पक्षाला राज्यात २० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंडखोरांमुळे राज्यातील समिकरण बदलेलं असा अंदाज आहे.
ELECTORAL EDGE च्या अंदाजानुसार, भाजपला २४ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस १७ टक्के मते घेऊ शकते. शिवसेनेला १० आणि ठाकरे गटाला १५ टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १४ तर अझित पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त ६ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.
वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.
Web Title: Who government will be formed in Maharashtra Assembly Election
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study